
नोकरी सांभाळून सामाजिक कार्यात अग्रेसर, महसूल विभागातील अष्टपैलू व्यक्तिमत्व – योगेश नन्नवरे
नोकरी सांभाळून सामाजिक कार्यात अग्रेसर, महसूल विभागातील अष्टपैलू व्यक्तिमत्व – योगेश नन्नवरे
जळगाव (प्रतिनिधी): स्व. भगवान श्रीपत नन्नवरे (माजी प्राचार्य, दलितमित्र, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार) आणि स्व. कलाबाई नन्नवरे (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका) यांच्या आशीर्वादाने २००८ साली महसूल विभागात लिपिक म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची सुरुवात करणारे योगेश भगवान नन्नवरे आज पुरवठा विभाग, चोपडा येथे गोदाम व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.
नोकरीच्या जोडीला सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्न केले. मंडळ अधिकारी म्हणून जळगाव तहसील कार्यालयात चार वर्षे यशस्वी कामकाज, तसेच जळगाव शहरात मंडळाधिकारीपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर सध्या पुरवठा विभागात ते कार्यरत आहेत. कोरोना काळात त्यांनी चार कॅम्पमधून लाखो लोकांना अन्नधान्याची सोय केली, जीवनदान योजनेत हजारो लोकांना दाखले देऊन मदत केली तसेच ३६ हजार रेशनकार्ड वाटपात मोलाचे सहकार्य केले.
सामाजिक कार्यात पुढाकार
बी एम फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांना रोजगार व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे यांसारखे अनेक उपक्रम राबवले. सुट्टीच्या दिवशी व रिकाम्या वेळेत ते संघटनेचे व सामाजिक कार्य करत राहिले. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना स्वामी समर्थ कर्मचारी पतसंस्था संचालक, तसेच राज्य शासकीय कर्मचारी पतसंस्था माजी संचालक म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या पत्नी स्वाती नन्नवरे या देखील जळगाव येथील अभियंता सोसायटीच्या १५ वर्षांपासून संचालिका आहेत.
परिवाराचे पाठबळ
योगेश नन्नवरे यांना पत्नी स्वाती (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव), भाऊ अतुल (आरोग्य सेवक, पाळधी), वहिनी वैशाली, बहीण सुजाता, मेव्हणे प्रा. युवराज मेढे तसेच मुलगा सम्यक (१२ वी सायन्स), मुलगी सांची (सेंट जोसेफ शाळा, जळगाव), भाची व भाचे असे संपूर्ण कुटुंब नेहमीच आधार देत आले आहे.
उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून गौरव
योगेश नन्नवरे यांच्या प्रामाणिक, पारदर्शक व प्रभावी कामकाजामुळे त्यांना ‘उत्कृष्ट महसूल अधिकारी’ म्हणून गौरविण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजू भोळे यांच्या हस्ते त्यांचा व त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला.
फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांचा ध्यास घेऊन सतत सेवा देण्याचा प्रयत्न करणारे योगेश नन्नवरे हे महसूल विभागातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम