न्यायालयातून जनतेपर्यंत – संविधान, स्वातंत्र्य आणि देशभक्तांची बलिदाने यांचा जागर”

बातमी शेअर करा...

“न्यायालयातून जनतेपर्यंत – संविधान, स्वातंत्र्य आणि देशभक्तांची बलिदाने यांचा जागर”

“स्वातंत्र्य दिन विशेष : बोदवड न्यायालयात स्वातंत्र्य संग्राम व घटनेचे शाश्वत मूल्य उजागर”

१५ ऑगस्ट सर्वोच्च मुहूर्ताचा दिवस – ॲड. अर्जुन पाटील

स्वातंत्र्यलढ्यात न्यायव्यवस्थेचे योगदान : बोदवड न्यायालयातील कार्यशाळा

बोदवड :स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व बुध्दीजीवी लोकांनी केल्यामूळे शेवटचा माणूस स्वतत्रलढ्यात जोडला गेला, आजच्या काळातही वकीलांनी जनतेच्या समस्यांसाठी जनहित याचिकांच्या माध्यमातून न्यायालयात बाजू मांडली पाहिजे. तसेच गरजूंना लीगल एड, मोफत कायदेविषयक सल्ला शिबिरे, लोकअदालतींचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळवून द्यावा, असे प्रतिपादन बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी केले.

१५ ऑगस्टच्या निमित्ताने बोदवड न्यायालयात झालेल्या स्वतत्रलढा व न्यायव्यवस्था या कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

आपल्या भाषणात ॲड. पाटील म्हणाले की, देशात मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आणि भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी न्यायव्यवस्था व कायद्याची भूमिका महत्त्वाची आहे. “कोणत्याही व्यक्तीस निर्धनतेच्या कारणास्तव न्याय नाकारता येणार नाही, यासाठीच लीगल एड कायदा करण्यात आला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, देशात सर्वात पवित्र ग्रंथ म्हणून भारतीय घटनेचे पूजन व वाचन प्रत्येकाने करावे. प्रत्येक घरात राज्यघटना असावी व पुढील पिढीला मूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून द्यावी.

त्यांनी देशातील तीन सर्वोत्तम मुहूर्त सांगताना २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १ मे या दिवशी शुभकार्य करावीत, असे आवाहन केले.
अमेरिकेने भारतावर लादलेल्या अवास्तव टेरिफ संदर्भात बोलताना त्यांनी गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचा दाखला देत “मेक इन इंडिया” चा स्वीकार करावा,
भारतीय वस्तू वापराव्यात असे आवाहन केले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती न्यायाधीश ए. पी. खोल्लम, बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, ॲड. आय. डी. पाटील, ॲड. के. एस. इंगळे आदी मान्यवर होती.
तसेच ॲड. किशोर ए. महाजन, ॲड. मिनल अग्रवाल, ॲड. विशाल पाटील, प्रशांत कुमार बेदरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले.

कार्यक्रमास ॲड. तेजस्विनी काटकर, ॲड. निलेश लढे, ॲड. विजय मंगळकर, ॲड. मोहित अग्रवाल, ॲड. अमोल सिंग पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे व कर्मचारी वर्गाने प्रयत्न केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम