पंकज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन जल्लोषात साजरा

बातमी शेअर करा...

पंकज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन जल्लोषात साजरा

चोपडा (प्रतिनिधी) : पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल, चोपडा येथे शिक्षक दिनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी हृदयस्पर्शी भाषणं सादर केली. इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी हेमांशी अहिरे व विधी पाटील यांनी आकर्षक सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली.

मुख्याध्यापक केतन माळी यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना “शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे खरे शिल्पकार आहेत. समाज व राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे योगदान अतुलनीय आहे” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना पुष्पगुच्छ अर्पण करून आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. संपूर्ण शाळेत आनंद, उत्साह आणि गुरुजनांविषयी आदराचे वातावरण अनुभवायला मिळाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम