
पंकज बोरोले यांचा शुभांगी पाटील यांच्या हस्ते सत्कार
रोटरी क्लबच्या असिस्टंट गव्हर्नर पदावर नियुक्तीबद्दल गौरव
पंकज बोरोले यांचा शुभांगी पाटील यांच्या हस्ते सत्कार
रोटरी क्लबच्या असिस्टंट गव्हर्नर पदावर नियुक्तीबद्दल गौरव
चोपडा: पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांची रोटरी क्लबच्या असिस्टंट गव्हर्नर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्षा आणि उबाठा गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिक्षण व सामाजिक कार्य या विषयांवर सखोल चर्चा झाली. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या, “ही संस्था शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असून, हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या कुटुंबाचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो.”
सत्कार सोहळ्याला संस्थेचे कार्याध्यक्ष बी. एम. तायडे, जिल्हा संघटक दिनेश साळुंखे, डी. बी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजयानंद शिंदे, तालुका उपाध्यक्ष विशाल कंखरे, भूषण पाटील आणि पत्रकार मिलिंद सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पंकज बोरोले यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अधिक भरीव कार्य करावे, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम