
पंकज विद्यालयाचे शिक्षक जिल्हास्तरीय नवोपक्रम व व्हिडिओ स्पर्धेत यशस्वी
अजय सैंदाणे यांना प्रथम, तरदिवाकर बाविस्कर यांना द्वितीय क्रमांक
पंकज विद्यालयाचे शिक्षक जिल्हास्तरीय नवोपक्रम व व्हिडिओ स्पर्धेत यशस्वी
अजय सैंदाणे यांना प्रथम, तरदिवाकर बाविस्कर यांना द्वितीय क्रमांक
चोपडा (प्रतिनिधी) – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा व शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा येथील शिक्षकांनी जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची ठसा उमटवला आहे.
विद्यालयाचे उपशिक्षक अजय सैंदाणे यांनी नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर उपशिक्षक दिवाकर जे. बाविस्कर यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून गौरव प्राप्त केला.
या दोन्ही स्पर्धांचे आयोजन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, तर दिवाकर बाविस्कर यांना ९,००० रुपये रोख रक्कम, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
सन्मान वितरण सोहळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, DIETचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. सुरेशबोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, सचिव अशोककोल्हे, संचालक पंकज बोरोले, नारायणदादा बोरोले, गोकुळ भोळे, भागवत भारंबे, तसेच मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, एम. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे, मिलिंद पाटील, केतन माळी, मीना माळी आणि संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम