
पंकज विद्यालयाच्या खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य
पंकज विद्यालयाच्या खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य
चोपडा (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात तालुका, जिल्हा आणि विभागस्तरावर आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत विभाग स्तरावर गरुड झेप घेतली आहे.
विभागस्तरावर निवड झालेले खेळाडूंमध्ये स्वप्निल बारेला – शालेय स्केटिंग स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून विभागस्तरावर निवड. शारोन ठाकूर (इ.११ वी विज्ञान) – बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तरावर निवड. नेहा पाटील (इ.१२ वी विज्ञान) – कॅरम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागस्तरावर निवड. रोशनी धनगर (इ.११ वी विज्ञान) – कॅरम स्पर्धेत जिल्हास्तरावर पाचवा क्रमांक, विभागस्तरावर निवड. कार्तीकेश बारी (इ.१० वी) – बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करत विभागस्तरावर निवड. या पाच विद्यार्थ्यांची विभागीय क्रिडा स्पर्धांसाठी दिमाखात निवड झाली आहे.
कोमल कैलास पाटील – गोळा फेक आणि ४०० मीटर धावणे स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरावर निवड. हर्षदा क्षीरसागर – १०० मी. व २०० मी. धावणे तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय, जिल्हास्तरावर निवड. प्रेरणा बाविस्कर– ३ कि.मी. धावणे तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरावर निवड. ४×१०० मीटर रिले स्पर्धा (मुली): कोमल पाटील, हर्षदा क्षीरसागर, प्रेरणा बाविसकर आणि श्रावणी सैंदाणे यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरावर निवड.
मुलांच्या गटातील विजेते: ज्ञानेश्वर संजय पाटील – ३००० मीटर धावणे तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरावर निवड. सागर तडवी – १५०० मीटर धावणे तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरावर निवड. मांगीलाल पावरा – ८०० मीटर धावणे तालुकास्तरावर प्रथम व २०० मीटर धावणे द्वितीय, जिल्हास्तरावर निवड. ४×१०० मीटर रिले स्पर्धा (मुलं): सागर तडवी, मांगीलाल पावरा, मुकुंदा कोळी आणि पराग शिरसाठ यांनी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला.
तसेच, १९ वर्षांखालील मुलींच्या गटात विद्यालयाने क्रिकेट स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला आहे.
या सर्व विजयी खेळाडूंचा गौरवपूर्ण सत्कार पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंकजभैय्या बोरोले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक अजय सैंदाणे सर या सर्वांचं मनापासून अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक श्री. अजय रमेश सैंदाणे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या मेहनती, शिस्त आणि चिकाटीमुळे विद्यालयाने क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, सचिव गोकुळ भोळे, संचालक नारायण दादा बोरोले, मुख्याध्यापक व्ही आर पाटील, नंदलाल वाघ, सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम