पंकज विद्यालयाच्या विद्यार्थिनीची शासकीय कॅरम स्पर्धेत विभाग स्तरावर झेप

बातमी शेअर करा...

पंकज विद्यालयाच्या विद्यार्थिनीची शासकीय कॅरम स्पर्धेत विभाग स्तरावर झेप

चोपडा (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ करत विभागस्तरावर झेप घेतली आहे.

कांताई सभागृह, जळगाव येथे उत्साहात संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 19 वर्षाखालील मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय प्रथम व पाचवे क्रमांकाचे विजेतेपद पटकावून विभागीय स्तरावर झेप घेतली.
19 वर्ष आतील मुलींच्या गटात
नेहा महेश पाटील हिने भुसावळ, अमळनेर, जळगाव व चोपडा तालुक्यांतील खेळाडूंना पराभूत करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदविली. चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात चोपडा येथील प्रताप विद्या मंदिर ला पराभूत करून नेहा पाटील जिल्ह्यात अजिंक्य ठरली. तसेच रोशनी शिवराम धनगर हिने भुसावळ, जामनेर आणि जळगाव तालुक्यांच्या प्रतिस्पर्धींना पराभूत करून पाचवा क्रमांक मिळवत विभागावर निवड होण्याचा सन्मान प्राप्त केला.

विभागस्तरावर निवड झालेल्या या दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींना प्रा.अजय सैंदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कु. नेहा पाटील आणि कु. रोशनी धनगर आणि मार्गदर्शक अजय सैंदाने सरांचे संस्थाध्यक्ष पंकजभैया बोरोले, संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश पंडित बोरोले व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक व्ही आर पाटील, प्रा नंदलाल वाघ व सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम