पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत सभा 9 ऑक्टोबरला

बातमी शेअर करा...

पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत सभा 9 ऑक्टोबरला

जळगाव, : ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्या अधिसूचनेद्वारे,जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती पद अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षित करण्यात येणार आहे.

आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या प्रवर्गासाठी सोडत पद्धतीने आरक्षित केली जाणार असून, यासाठीची सोडत सभा दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेस सर्व संबधितांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे प्रसिद्धी पत्रकानव्ये करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनाही या सभेस उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. असेही प्रशासनाने कळविले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम