पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त विद्यापीठात ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रम

बातमी शेअर करा...

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त विद्यापीठात ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रम

जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्र प्रशाळेच्या सभागृहात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त “एक दीन, एक घंटा, एक साथ – राष्ट्र स्वच्छता अभियान” अंतर्गत स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककांतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात ५ लाखांवर पोहोचली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजातील समस्या समजतात आणि आदर्श नागरिक होण्यास मदत मिळते,” असे ते म्हणाले. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचे आजच्या पिढीसाठी महत्त्व अधोरेखित केले.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. वैयक्तिक स्वच्छतेसोबतच परिसर स्वच्छतेवरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, NSS संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास दांडगे, मनोज इंगोले व डॉ. कविता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर विद्यापीठ परिसरात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम