पतसंस्था संचालक आणि कर्जदारांच्या मालमत्ता मधून ठेवीदारांना ठेवी द्या

बातमी शेअर करा...

पतसंस्था संचालक आणि कर्जदारांच्या मालमत्ता मधून ठेवीदारांना ठेवी द्या

खान्देश ठेवीदार कृती समितीचे साखळी उपोषण

फैजपूर प्रतिनिधी पतसंस्था संचालक व कर्जदाराच्या मालमत्ता ठेवीदारांना सरसकट देण्याचे आदेश देण्यात यावे यासाठी खान्देश ठेवीदार कृती समितीतर्फे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून या मागणीचे निवेदन फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

रावेर व यावल तालुक्यातील सहकारी पतसंस्थांमधून संचालक आणि कर्जदारांच्या मालमत्ता ठेवीदारांना देण्यात याव्यात या मागणीसाठी आज उपविभागीय अधिकारी यांना ठेवी परत मिळत नसल्याने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून आज सकाळी 11 ते 2 या वेळेत साखळी उपोषण करण्यात आले असून दररोज हे उपोषण सुरु राहणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम