
पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला मारहाण
पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला मारहाण
जळगाव : कौटुंबिक वादाच्या कारणावरुन पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या देवानंद साहेबराव वाघ (वय २९, रा. नांदवेल, ता. मुक्ताईनगर) यांना दोघांनी शिवीगाळ करीत लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना दि. १० रोजी दुपारच्या सुमारास श्रीकृष्ण कॉलनीत घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
मुक्ताई नगरातील नांदवेल येथे राहणारे देवानंद साहेबराव वाघ (वय २९) हे दि. १० रोजी श्रीकृष्ण कॉलनीत पत्नीला घेण्याकरीता आले होते. त्यावेळी त्यांचे मामेसासरे कृष्णा भिला सोनवणे व त्यांच्या घराशेजारी राहणारा राजू शौकत तडवी याने कौटुंबिक कारणावरुन शिवीगाळ
करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडी दांडक्याने देवानंद वाघ यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, त्यांनी उपचार घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ भटू पाटील हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम