पत्रयोगी जीवन गौरव पुरस्काराने वृत्तपत्र विक्रेते सन्मानित

बुलढाणा येथील गर्दी सभागृहात पुरस्कार सोहळा

बातमी शेअर करा...

पत्रयोगी जीवन गौरव पुरस्काराने वृत्तपत्र विक्रेते सन्मानित
बुलढाणा येथील गर्दी सभागृहात पुरस्कार सोहळा
शेगाव /प्रतीनीधी

शेगाव–बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे वतीने जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांना पत्र योगी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सोहळा बुलढाणा येथील गर्दी सभागृहात दिनांक 16 फेब्रुवारी 25 रोजी संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये शेगाव येथील पत्रकार वृत्तपत्र विक्रेते प्रकाश उन्हाळे गोविंदराव धनगर नारायण ठोसरे व बुलढाणा येथील वृत्तपत्र विक्रेते दादा चिंचोळकार नंदकिशोर चिंचोळ कार उगले काका रवींद्र चिंचोळकर खामगाव येथील अशोकराव तुला की संग्रामपूर येथील केशव घाटे इत्यादींना मान्यवरांची हस्ते पत्र योगी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे हे होते यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव राज्याचे कामगार कल्याण मंत्री आकाश दादा फुंडकर आमदार संजय गायकवाड आमदार संजय कुटे आमदार धीरज लिंगाडे आमदार सिद्धार्थ खरात आमदार मनोज कायंदे बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्यामजी चांडक ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो या माध्यमातून पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते सातत्याने समाज प्रबोधनाचे काम करीत असतात त्यामुळे या पुरस्काराने त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कठीण परिस्थितीतील निस्वार्थ सेवेचा ते गौरव या पुरस्कारामुळे झाला असल्याचे मत बुलढाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र टिकार यांनी व्यक्त केले यांनी व्यक्त केले व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम