परप्रांतीय कापड व्यापाऱ्याला ५३ हजारांत गंडविले

बातमी शेअर करा...

परप्रांतीय कापड व्यापाऱ्याला ५३ हजारांत गंडविले

तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी शहरातील सिल्व्हर प्लाझा लॉजमध्ये परप्रांतीय कापड व्यापाऱ्याची ५३ हजार ४५० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना बुधवारी २६ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेरठ येथील इकरार इसरार अहमद (३०) हे कापड व्यापारी असून व्यवसायाच्या निमित्ताने ते जळगावात आले होते. यावेळी त्यांच्या ओळखीतील अफजल, तसेच आरी आणि असलम (पूर्ण नावे अज्ञात) या तिघांनी त्यांचा विश्वास संपादन करत १ लाख ३ हजार ४५० रुपये किंमतीची ४५० ब्लँकेट्स विकत घेतली.

मोबदल्यात त्यांनी फक्त ५० हजार रुपये ऑनलाईन दिले. मात्र उर्वरित ५३ हजार ४५० रुपये देण्याचे टाळले. वारंवार मागणी करूनही पैसे न दिल्याने अखेर अहमद यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम