बातमीदार | दि २० जानेवारी २०२४
इकरा थीम कॉलेज मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर परिसंवाद
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड खूप महत्त्वाची आहे. डॉ.अब्दुल करीम सालार यांचे वक्तव्य
जळगांव – इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव द्वारा संचलित एच.जे. कला व विज्ञान महाविद्यालय मेहरूण जळगावच्या वतीने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या विषयावरील चर्चासत्रा चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अब्दुल करीम सालार होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.इकबाल शाह यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात इजाज मलिक, माजिद सेठ झकेरिया, सर्व प्राध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मौलाना मुजम्मिलोद्दीन नदवी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने प्रा डॉ अख्तर शाह यांनी केली यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चांद खान यांनी मांडले. प्राध्यापक डॉ. वकार शेख यांनी डॉ.अनिल डोंगरे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमात एजाज मलिक, डॉ.इकबाल शाह यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर डॉ.अब्दुल करीम सालार यांनी अध्यक्षीय भाषण केले. ते म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्याची ध्यास उरलेली नाही. त्यांनीं शिक्षणा कडे आपले लक्श दिले पाहिजे.
यानंतर विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे डीन डॉ.अनिल डोंगरे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे? त्याचे महत्त्व व उपयुक्तता काय ? त्यांनी विद्यार्थ्यां समोर मांडली.
त्यांनी आपले विचार अतिशय रंजक पद्धतीने मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी – प्रा.इब्राहिम पिंजारी, प्रा.डॉ. राजेश भामुर्रे, डॉ.तनवीर खान यांच्या सह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा👇
श्रमसंस्कार शिबिर – एच जे थीम कॉलेज मध्ये २४ जानेवारी पर्यंत श्रमसंस्कार शिबिर
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम