
पर्यटन संचालनालयाची नवी पहल महा बुकिंग डॉट कॉम पोर्टलवर मोफत व्यवसाय नोंदणी सुरू
पर्यटन संचालनालयाची नवी पहल महा बुकिंग डॉट कॉम पोर्टलवर मोफत व्यवसाय नोंदणी सुरू
जळगाव, प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत mahabooking.com हे नवे पोर्टल सुरू करण्यात आले असून, राज्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवसायांना या पोर्टलवर निःशुल्क नोंदणी करता येणार आहे.
हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कृषी पर्यटन केंद्र, पर्यटन व्हिला, कन्वेन्शन सेंटर, वेलनेस सेंटर, इको टुरिझम यासह टूर व ट्रॅव्हल्स, गाईड सेवा, निवास व न्याहारी केंद्रे, आर्ट अँड क्राफ्ट शॉप्स, प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने आणि अशा विविध व्यवसायांनी या पोर्टलवर आपली माहिती व फोटो अपलोड करून नोंदणी करावी.
या पोर्टलद्वारे पर्यटकांना सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, थेट ऑनलाईन बुकिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्यात थेट संपर्क साधणे सुलभ होणार आहे.
पर्यटन संचालनालयाकडून सर्व पर्यटन व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्वरित mahabooking.com या पोर्टलवर आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विभागाने केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन,
शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान जवळ, नाशिक – ४२२००१
दूरध्वनी: (०२५३) २९९५४६४
मोबाईल: ८३९०७३१७३७ / ७५८८९५०६९७
ई-मेल: ddtourism.nashik-mh@gov.in
वेबसाईट – www.mahabooking.com
—

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम