पलोड शाळेमध्ये सी.बी.एस.ई.तर्फे शिक्षकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण
क्लासरूम मॅनेजमेंट भाग १ याविषयावर मार्गदर्शन
पलोड शाळेमध्ये सी.बी.एस.ई.तर्फे शिक्षकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण
क्लासरूम मॅनेजमेंट भाग १ याविषयावर मार्गदर्शन
जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दि . १ आणि २ फेब्रुवारी रोजी सी.बी.एस.ई तर्फे शिक्षकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी सी .बी .एस .ई .कडून शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले .पहिल्या दिवशी तज्ज प्रशिक्षक सौ. शोभा लक्ष्मीनारायण सोनी यांनी क्लासरूम मॅनेजमेंट भाग १ याविषयावर मार्गदर्शन केले . यामध्ये शिक्षकांची वर्गातील जबाबदारी आणि दायित्व , चांगल्या शिक्षकांमध्ये कोणते गुण असावेत आणि त्या गुणांचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कसा उपयोग होतो याविषयी विविध उदाहरणांद्वारे समजावून सांगितले .या संदर्भात त्यांनी शिक्षकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करून घेतल्या .प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी श्री . जितेंद्र सिंग यांनी क्लासरूम मॅनेजमेंट भाग २ मध्ये रुल्स ऑफ डिसिप्लिन अँड पनिशमेंट यातील फरक सांगून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ,नियमांचे पालन या कशा रुजवाव्यात हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून आणि शिक्षकांकडून विविध प्रश्नावली सोडवून घेत प्रत्यक्ष अनुभवातून सांगितल्या .या प्रशिक्षणासाठी शाळेतील एकूण ६० शिक्षक सहभागी झाले .या प्रशिक्षण हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि पलोड शाळेच्या शालेय समिती प्रमुख सौ. हेमलताताई अमळकर, शाळेचे प्राचार्य श्री . प्रविण सोनावणे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी श्री . मिलिंद पुराणिक, शाळेच्या समन्वयिका सौ .स्वाती अहिरराव , सौ . अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले .
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम