पलोड शाळेमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

पलोड शाळेमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. मुकुंद साहेबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मयूर चौधरी, विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा हेमाताई अमळकर, शाळेचे माजी विद्यार्थी व शालेय समिती सदस्य सरल चोपडा, मुख्याध्यापक श्री. प्रवीण सोनावणे, समन्वयिका स्वाती अहिररावअनघा सागडे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे महत्त्व पियुष कराड, पूर्वजा पाटील, प्रथमेश चव्हाण, आणि क्रितिका पवार या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साही लाठी-काठीचे सादरीकरण केले. विद्यार्थिनी अर्निका पाटील हिने भारत मातेचा वेष परिधान केला होता, तर Sr. Kg च्या स्पंदन गुरव या विद्यार्थ्याने स्वातंत्र्य दिनाचे गाणे सादर केले.

कार्यक्रमाचा समारोप माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह, शिक्षकांसह आणि व्यवस्थापन सदस्यांसह ‘वॉल ऑफ फेम’चे उद्घाटन करून केला, जो शाळेसाठी अभिमानाचा क्षण होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोनाली पाटील, जयेश देशमुख, शिल्पा मांडे, रूपाली निकम, आणि कंचन सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय पूनम पाटील यांनी करून दिला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण सोनावणे व समन्वयिका स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम