पळसोद येथे २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

पळसोद येथे २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी :
जळगाव तालुक्यातील पळसोद गावात गुरुवारी (दि. ६) सायंकाळच्या सुमारास एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पळसोद येथील रहिवासी सुनिल भगवान सोनवणे (वय २८) या तरुणाने सायंकाळी आपल्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळानंतर घरच्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सुनिलला मृत घोषित केले.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. तालुका पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

गावातील शांत स्वभावाचा आणि सर्वांशी मनमोकळेपणाने वागणाऱ्या सुनिलच्या अचानक मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम