
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात ३ मे रोजी मूकमोर्चा
शहरातून दहा हजाराहून नागरिक होणार सहभागी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात ३ मे रोजी मूकमोर्चा
शहरातून दहा हजाराहून नागरिक होणार सहभागी
जळगाव (प्रतिनिधी) काश्मिरमधील पहलगाम या पर्यटन स्थळी दहशतवाद्यांनी 28 गैर मुस्लिम पर्यटकांची निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरातील विविध संस्था, संघटना यांनी एकत्र येऊन शनिवार, दि. 3 मे 2025 मूकमोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव नागरिक मंचच्या पुढाकारात झालेल्या बैठकीत जळगाव रोटरी परिवार, जळगाव जिल्हा गणेश महामंडळ आणि युवाशक्ती फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी सहभागी होऊन मोर्चा आयोजनाचा निर्धार केला. देशविरोधी दहशतवादी, आतंकवादी यांच्या भितीदायक कृत्यांना समस्त नागरिकांचा एकत्रित विरोध दर्शविण्यासाठी जळगाव शहरातून किमान 10 हजार नागरिकांचा मूकमोर्चा आयोजित करण्याचे ठरले.
या मोर्चास दि. 3 मे ला सकाळी 7 वाजता शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रारंभ होईल. हा मोर्चा पुढे नेहरू पुतळा, शास्त्री टॉवर, चित्रा चौक, बेंडाळे चौक, जिल्हा सामान्य रूग्णालय, टपाल कार्यालय या मार्गाने स्वातंत्र्य चौकात पोहचेल. तेथे तास भर ठिय्या आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन स्विकृतीसाठी आंदोलन स्थळी विनंती करून बोलावले जाईल. या आंदोलनात जळगाव शहरातील इतर ज्या संस्था, संघटना यांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी जळगाव नागरिक मंच (मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि, चे कार्यालय, आकाशवाणी चौक, जळगाव) येथे संपर्क साधावा.
अर्धा दिवस बाजारपेठ बंदचे आवाहन शनिवार, दि. 3 मे 2025 रोजी आयोजित मूकमोर्चाच्या निमित्ताने जळगाव नागरिक मंचसह इतर संस्था संघटनांनी जळगाव शहरातील दुकानदार, व्यापारी, व्यवसायिक यांना आवाहन केले आहे की, मोर्चात किमान 10 हजार नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत शहरातील मुख्य अणि उपनगरांमधील बाजारपेठ बंद ठेवावी. यासाठी कोणतीही संस्था अथवा संघटना आपणास येऊन विनंती करणार नाही अथवा व्यवहार बंद करण्यासाठी आग्रह करणार नाही.
देश विरोधी विक्रेता आणि सेवांना विरोध अयोध्येत श्री राम मंदिरची उभारणी, 370 कलम रद्द करणे, समान नागरिक कायदा तयार करण्याचा प्रयत्न आणि अलीकडे वक्फ बोर्डाच्या कामकाजाच्या पद्धतीत बदल करणे हे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा करून आणि बहुमताने घेतला आहे. हे सर्व निर्णय भारतीय संविधान तथा राज्य घटनेच्या तरतुदींना समोर ठेवून केले जात आहेत. मात्र या सर्व निर्णयांचा विरोध करणारी देश विरोधी प्रवृत्ती देशांतर्गत वाढत आहे. ही प्रवृत्ती विशिष्ट धर्म व जात यांच्याशी संबंधित नाही. तरीही काही समूहांचा अजेंडा हा केंद्र सरकारच्या निर्णयांच्या विरोधात आणि देशातील हिंदू बहुल लोकसंख्येच्या विरोधात आहे. या वस्तूस्थितीचा गांभिर्याने विचार करून जळगाव नागरिक मंचने देशाविषयी स्वाभिमान दर्शवीत ‘देश विरोधी विक्रेता आणि सेवांना विरोध’ अशी उघड भूमिका घेतली आहे.
वरील विशेष उल्लेखित घडामोडींच्या विरोधात कोणत्या धर्माचा समूह आहे याचे सार्वजनिक भान नागरिकांना आहे. त्यामुळे कार्यालयीन- घरगुती- कौटुंबिक अशा कार्यात लागणार्या वस्तू वा सेवांची खरेदी देशविरोधी विक्रेता यांच्याकडून करू नये, असे आवाहन करणारी आणि सविस्तर भूमिका मांडणारी प्रचार पत्रके जळगाव शहरात जळगाव नागरिक मंचच्या मार्फत वितरीत केली जाणार आहे. या निमित्ताने दि. 24 एप्रिल ते 3 मे दरम्यान देशाभिमान जागृती सप्ताह पाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम