पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला गती

अशोका बिल्डकॉनची ५६८ कोटींची निविदा रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर

बातमी शेअर करा...

पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला गती

अशोका बिल्डकॉनची ५६८ कोटींची निविदा रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर

पाचोरा-जामनेर ब्रॉड गेज रेल्वे मार्गासाठी प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसाठी १२ एप्रिलचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. रेल्वे मंत्रालयाने या ५३ किमी लांबीच्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अशोका बिल्डकॉन लिमिटेड या नामांकित कंपनीला ५६८.८६ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे. यामध्ये संपूर्ण सिव्हिल वर्क – अंडरब्रिज, ओव्हरब्रिज, पूल, रस्ते, पथवे तसेच पाचोरा यार्डचे काम समाविष्ट आहे.

या प्रकल्पाची पूर्णता मुदत ३० महिने असून, त्यानंतर रेल्वे ट्रॅक टाकण्याचे व सिग्नलिंगचे काम सुरू होणार आहे. अशोका बिल्डकॉनने सर्वात कमी दरात निविदा सादर करून प्रकल्पाची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी वेळेत व दर्जेदार काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

या प्रकल्पामुळे पाचोरा व जामनेर तालुक्यांसह परिसरातील गावांना मोठा फायदा होणार असून, प्रवासी व मालवाहतुकीस चालना मिळेल. स्थानिक उद्योग, शेतीमाल वाहतूक, पर्यटन व रोजगार वाढीस मदत होणार आहे.

या प्रकल्पासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या कृती समिती, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले आहे. प्रकल्प EPC (इंजिनियरिंग, प्रोक्युरमेंट, कन्स्ट्रक्शन) मॉडेलनुसार राबवण्यात येणार आहे, त्यामुळे गती, गुणवत्ता व पारदर्शकतेची अपेक्षा आहे.

हा प्रकल्प केवळ एक जोडमार्ग नसून, उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. वेळेत काम पूर्ण झाल्यास हा मार्ग इतर प्रकल्पांसाठीही आदर्श ठरेल.

शिष्यवृत्ती उपक्रमाबरोबरच संस्कार शाळांसाठी पाच खोल्यांची बांधणी, महिलांच्या विकासासाठी स्वयंरोजगार प्रोत्साहन, आणि समाजातील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्याचा देखील मानस असल्याचे यावलकर परिवाराने नमूद केले.

“प्रत्येक यशस्वी व्यक्तीने समाजातील इतरांना पुढे नेणं, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे,” असे सांगत अँड. यावलकर यांनी समाजाला शिक्षण, उद्योजकता आणि सामाजिक जाणीव यामध्ये एकत्र आणण्याची प्रेरणा दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम