पाचोरा तालुक्यातील रेल्वे रुळांवर एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह

आत्महत्येचा प्राथमिक अंदाज, परिसरात हळहळ

बातमी शेअर करा...

पाचोरा तालुक्यातील रेल्वे रुळांवर एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह

आत्महत्येचा प्राथमिक अंदाज, परिसरात हळहळ

पाचोरा | प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यात मंगळवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर एकाच कुटुंबातील तिघांचे – एक पुरुष, एक महिला आणि सुमारे तीन वर्षांच्या चिमुकल्याचे – छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आले. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांची पाहणी करून ते पंचनामा करून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळावरील परिस्थिती आणि मृतांची अवस्था पाहता, ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सदर मृतक कोणत्या गावातील आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाचोरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या तिघांबाबत काहीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
चिमुकल्याचा मृत्यू पाहून डोळे पाणावले

या दुर्दैवी घटनेत एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी उपस्थित राहिलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम