
पाचोरा नगरपालिका भाजपच्या ताब्यात द्या ;पाचोरा शहर दत्तक घेणार – ना. गिरीश महाजन
पाचोरा नगरपालिका भाजपच्या ताब्यात द्या ;पाचोरा शहर दत्तक घेणार – ना. गिरीश महाजन
-मानसिंग का मैदानात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मानसिंग का मैदान येथे भव्य जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सुचेता दिलीप वाघ तसेच सर्व २८ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला नागरिक, महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सभेस मंत्री ना. गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, मधुकर काटे तसेच भाजपचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, “पाचोर्यातील सर्व २८ नगरसेवक उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुचेता दिलीप वाघ यांना विजयी करा. विजय मिळताच पाचोरा शहर दत्तक घेऊन विकासकामांना मोठ्या वेगाने चालना देऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच पाचोरा तालुक्यात बलुन बंधारे बांधण्यात येवुन सिंचनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही पाचोराच्या सर्वांगीण विकासावर भाष्य करत भाजपा पॅनल सर्वसंमतीने निवडून देण्याचे आवाहन केले. अमोल भाऊ शिंदे, वैशाली सूर्यवंशी, माजी आमदार दिलीप वाघ आणि मधुकर काटे यांनीही आपल्या भाषणातून पाचोराच्या विकासाचा संकल्प मांडला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम