पाचोरा भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटींचे अनुदान मंजूर

आ. किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

बातमी शेअर करा...

पाचोरा भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटींचे अनुदान मंजूर

आ. किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

पाचोरा प्रतिनिधी
शासनातर्फे पाचोरा भडगाव मतदार संघातील ८६७३३ शेतकर्‍यांना सुमारे १०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केली असुन लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर हा निधी पडणार आहे.

पाचोरा, भडगाव – सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठीयेणारा गुढी पाडवा हा या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांंना गोड जाणार असल्याची माहीती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपाचे मधुकर काटे, सभापदी गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, किशोर बारवकर, सुनिल पाटील, गंगाराम पाटील, राजेंद्र पाटील, प्रविण ब्राम्हणे, संजय सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार किशोर पाटील म्हणाले की, राज्यातय आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमानुसार, पाचोरा तालुक्यातील ५१ हजार ६६ . ७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ५२ हजार ३६४ शेतकऱ्यांना एकूण ६९ कोटी ४५ लाख २२ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

तर भडगाव तालुक्यातील २२ हजार १०० . १५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ३४ हजार ३६९ शेतकऱ्यांना एकूण ३० कोटी ५ लाख ६२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. शेतकर्‍यांना हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी. बी. टी. पोर्टलद्वारे वितरित केले जाणार आहे. यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शेतकऱ्यांची बँकनिहाय व आधार क्रमांकानुसार यादी तयार करत आहेत. अनुदान मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी “आपले सरकार” केंद्रात जाऊन तत्काळ ई – केवायसी करावी, जेणेकरून निधी त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल. शासनाने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला असून सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच तात्कालीन माजी मुख्यमंञी एकनाथ शिंदे, माजी दोन्ही उपमुख्यमंञी व जिल्ह्याचे माजी मंत्री अनिल पाटील यांचे आभारही आमदार किशोर पाटील यांनी मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम