
पाचोरा येथे ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ तक्रार निवारण सभा; ग्रामीण भागातील समस्या त्वरित सोडवण्याचा उपक्रम
पाचोरा येथे ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ तक्रार निवारण सभा; ग्रामीण भागातील समस्या त्वरित सोडवण्याचा उपक्रम
पाचोरा प्रतिनिधी: जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या जनकेंद्रीत उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यासाठी पाचोरात तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी संकुलात होणार आहे.
सभेला आमदार किशोर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हा स्तरावरील सर्व विभागप्रमुखही या सभेत सहभागी होतील. ग्रामीण भागातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांना टोकन दिले जाईल. टोकन क्रमांकानुसार तक्रारदारांची समस्या ऐकून घेऊन त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.बी. अंजने यांनी या संदर्भात माहिती देत, ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन केले आहे. पंचायत समिती प्रशासनाकडून या उपक्रमाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम