
पाचोरा येथे फिरते लोक न्यायालय संपन्न
पाचोरा येथे फिरते लोक न्यायालय संपन्न
१ लाख २० हजार ६०० रुपयांची झाली वसुली
पाचोरा प्रतिनिधी ;- उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये २४ रोजी पाचोरा पोलीस स्टेशन आवारात तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील बांधव पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने सदरील मोबाईल लोक अदालत व्हॅन च्या माध्यमातून फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मंचावर प्रमुख न्यायाधीश एस. व्ही. निमसे, सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा मॅडम, सरकारी अभियोक्ता रंजना हटकर, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, सपोनि दिनेश भदाणे, अॅड. प्रवीण पाटील, अॅड. अभय पाटील, अॅड. निलेश सूर्यवंशी, अँड सुनील सोनवणे, अॅड. कविता मासरे रायसाकडा उपस्थित होते. यापूर्वी २३ रोजी पिंपळगाव येथे व २४ रोजी पाचोरा येथे एकूण २७ केसेसचा निपटारा झाला यातूनच १ लाख २० हजार ६०० रुपयांची वसुली झाली. यावेळी जनजागृती कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले.
शिबिरात प्रा. सुनीता गुंजाळ यांनी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच ललिता पाटील यांनी महिलांच्या लैंगिक शोषण विषयी सांगितले. यानंतर प्रा. वैशाली बोरकर यांनी फिरते लोक अदालत चे महत्व व लाभ सांगितले. यानंतर अॅड. कैलास सोनवणे यांनी महिलांचे संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती जी.एस.बोरा, सह दिवाणी न्यायाधीश यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात फिरते लोक अदालत चे विविध लाभ, योजना, महत्त्व स्पष्ट केले. यावेळी मोठया संख्येने सन्माननीय वकील बांधव, पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रवीण पाटील तसेच अॅड. अभय पाटील यांनी तसेच सूत्रसंचालन दिपक तायडे यांनी केले तर आभार सपोनि दिनेश भदाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी यावेळी पहलगाम येथील अतिरेकी च्या हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पो. हे. का. दीपक पाटील, विकास सूर्यवंशी, सुनील पाटील, संदीप भोई, समीर पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, हरीश अहिरे तसेच न्यायालयीन कर्मचारी, वकील बांधव, यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम