पाचोरा येथे बँकेतून काढलेले दोन लाख लंपास; सीसीटीव्हीमध्ये तीन चोरटे कैद

बातमी शेअर करा...

पाचोरा येथे बँकेतून काढलेले दोन लाख लंपास; सीसीटीव्हीमध्ये तीन चोरटे कैद

 

पाचोरा: शहरातील जे.डी.सी.सी. बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून लांबविल्याची घटना नुराणी नगर येथे घडली आहे. या घटनेत एक अल्पवयीन मुलगा आणि दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील न्यू उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शाळेसाठी कॉम्प्युटर घेण्यासाठी आणि बांधकामासाठी लागणारे पैसे देण्यासाठी बँकेतून दोन लाख रुपये काढले. बँकेतून पैसे काढत असतानाच एक चोरटा त्यांच्यावर पाळत ठेवून होता. मुख्याध्यापकांनी ही रक्कम शाळेचे सेवावृत्त शिक्षक शेख खलील शेख नुरा यांच्याकडे दिली, जेणेकरून ती सुरक्षित राहील.

शेख खलील नुरा यांनी ती रक्कम त्यांच्या मोपेडच्या डिक्कीत ठेवून घराकडे निघाले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मोपेड कम्पाऊंडमध्ये लावली. त्याचवेळी, समोर रस्त्यावर एका लहान मुलाने फिट आल्याचा बनाव केला. शेख खलील नुरा यांनी त्या मुलाला मदत करण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतली. याचवेळी मोपेडची चावी तशीच राहिली होती.

याच संधीचा फायदा घेत दोन अज्ञात इसम मोटरसायकलवर आले आणि त्यांनी शेख खलील नुरा यांना घरातून पाणी आणण्यास सांगितले. ते पाणी घेण्यासाठी घरात गेले असता, चोरट्यांनी मोपेडच्या डिक्कीतील दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली आणि लहान मुलासह पळून गेले.

पोलिसांकडून तपास सुरू

घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर शेख खलील नुरा यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले असून, चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजानन देशमुख पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम