
पाचोरा येथे ‘लंडन किड्स’ प्रिस्कूलचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पाचोरा येथे ‘लंडन किड्स’ प्रिस्कूलचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा अध्याय सुरू
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा शहरात जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा अध्याय सुरू करणाऱ्या ‘लंडन किड्स’ या आंतरराष्ट्रीय संकल्पनेवर आधारित प्लेग्रुप आणि प्रिस्कूलचा भव्य उद्घाटन सोहळा ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्वामी समर्थ केंद्रालगत, संघवी कॉलनी येथे पार पडला. या प्रसंगी पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला मान्यवर, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक आणि लहान मुलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.‘लंडन किड्स’ हे युके आधारित प्रिस्कूल असून, यात प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजीचे शिक्षण दिले जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारी ही संस्था ऑडियो-व्हिज्युअल शिक्षण, योगा, संगीत आणि हस्तकला यांसारख्या उपक्रमांद्वारे मुलांना सक्षम बनवते. ‘लंडन किड्स म्हणजे स्मार्ट किड्स’ या ब्रीदवाक्याला साजेशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. यामध्ये सीसीटीव्ही निगराणी, डॉक्टर ऑन कॉल, मासिक वैद्यकीय तपासणी, जागतिक स्तरावरील पुरस्कारप्राप्त ब्रँड, प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि सुरक्षित वातावरणाचा समावेश आहे.हा ब्रँड देशभरातील २७ राज्यांमध्ये १,३७५ केंद्रांसह कार्यरत आहे. २०१९ मध्ये ‘सिलिकॉन इंडिया’ने ‘मोस्ट प्रॉमिसिंग प्रिस्कूल’ आणि ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ असे जागतिक पुरस्कार प्रदान केले आहेत. उद्घाटन सोहळ्यात संचालक मंडळाचे चेअरमन जितेंद्र बन्सीलाल जैन, कोषाध्यक्ष नितीन स्वतंत्र जैन, महावीर दिलीप श्रीश्रीमाळ, यश मनोज संघवी, डॉ. प्रितेश पन्नालाल संकलेचा, आदेश विजय संघवी, सचिव डॉ. रोहित सतीश बोथरा, इंजि. कल्पेश नेमीचंद धाडीवाल, इंजि. भुषण अनिल बांठीया, कमलेश केवलचंद सुराणा, रोशन दिलीप पारख आणि मयुर सुनिल बाफना उपस्थित होते.शाळेच्या प्राचार्या प्रियंका कुमावत यांच्यासह शिक्षक चांदनी चेतन ओझा, मेहेर अनिल नागरानी आणि योगा शिक्षिका भावना संजय चोरडिया यांचा सहभाग होता. नवकार ग्रुप, प्रथम राजेंद्र बाफना, अनुप विजय बरमट आणि सुरेश सुपडू पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. उद्घाटनानंतर ४ ते ११ एप्रिल दरम्यान सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत मोफत उपक्रम शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘इन्रोल नाउ, लिमिटेड सिट्स’ असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे पालक आणि मान्यवरांनी कौतुक केले. पाचोऱ्यातील बालशिक्षणाला नवे परिमाण देणारी ही संकल्पना असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांच्या योगदानाने हा सोहळा यशस्वी झाला. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम