पाचोरा लोकन्यायालयात ऐतिहासिक निकाल!

बातमी शेअर करा...

पाचोरा लोकन्यायालयात ऐतिहासिक निकाल!

१०५८ प्रकरणांचा निपटारा; ४ कोटी १८ लाख रुपयांची वसुली

पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती व पाचोरा तालुका विधिज्ञ संघाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. प्र. अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या अध्यक्षतेखाली २२ मार्च रोजी हा लोकन्यायालय उपक्रम राबवण्यात आला.

१६६ प्रलंबित आणि ८९२ वादपूर्व प्रकरणे निकाली

या लोकन्यायालयात दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे आणि २ रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १६६ प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली, यात २ कोटी ४ लाख १४ हजार ५८३ रुपये वसूल करण्यात आले.

तसेच ८९२ वादपूर्व प्रकरणांत तडजोड घडवून आणत २ कोटी १४ लाख २६ हजार ८९२ रुपये वसूल करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १०५८ प्रकरणांमध्ये ४ कोटी १८ लाख ४१ हजार ४७५ रुपये इतकी मोठी रक्कम वसूल करण्यात आली.

विशेष बाबी आणि तडजोड प्रकरणे

  • १० वर्षे जुने चार दिवाणी दावे तडजोडीतून निकाली
  • व्हर्च्युअल पद्धतीने दोन प्रकरणे निकाली
  • कौटुंबिक वादातील २० प्रकरणे सोडवली

अधिकार्‍यांचा सक्रीय सहभाग

पॅनल प्रमुख श्रीमती जी. एस. बोरा, तसेच पंच सदस्य ललिता पाटील यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. तसेच या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी पाचोरा न्यायालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी, वीज महावितरण विभाग, बी. एस. एन. एल. अधिकारी, पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.

पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकन्यायालयात मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते आणि तडजोडीतून न्याय मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या ऐतिहासिक लोकन्यायालयाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संबंधितांचे विशेष कौतुक केले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम