पाचोरा शहरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन पी

बातमी शेअर करा...

पाचोरा शहरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

पाचोरा प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे शहरातुन पथसंचलन करण्यात आले. हे पथसंचलन उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम व पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या पथसंचलनात ६ अधिकारी, २५ पोलीस कर्मचारी, ६० एस. आर. पी. एफ. जवान आणि ९५ होमगार्ड सहभागी झाले होते. पथसंचलन हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होऊन हुतात्मा स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्थानक रोड, देशमुख वाडी, पंचमुखी हनुमान चौक, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आले. या पथसंचलनामुळे शहरात शांततेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनीही सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे व अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम