
पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
ढोल ताशाच्या गजरात पाचोरा नगरी भगवामय
पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
ढोल ताशाच्या गजरात पाचोरा नगरी भगवामय
पाचोरा प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची सजीव आरस साकारून विद्यार्थ्यांनी मिरवणूकीत सहभाग घेतला. दरम्यान शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिमाखात व उत्साहात साजरी करण्यात आली. या निम्मिताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शालेय विद्यार्थांनी, लेझिम, सजीव आरास, रॅली तसेच स्केटिंग मावळे यांनी मिरवणुकीत सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. ढोल ताशाच्या गजरात पाचोरा नगरी भगवामय झाली होती.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने शालेय कार्यक्रम आयोजित करून, पोवाडा, भाषण आणि शालेय विद्यार्थी ज्यांनी वेशभूषा आणि भाषण दिले यांना प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष तथा पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पाचोरा शहरवासी यांचं कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम