
पाचोर्यात सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह ताब्यात
पाचोर्यात सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह ताब्यात
पाचोरा : शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगार समाधान बळीराम निकम (वय ३७, रा. अंजाळा, ता. यावल, ह.मु. जाधववाडी, पाचोरा) याला गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि रिकामी मॅगझीनसह अटक केली. जप्त केलेल्या ऐवजाची किंमत सुमारे २३ हजार रुपये आहे.
२२ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता आरोपी संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. झडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा आणि काडतूस मिळाले. चौकशीत आरोपीवर चाळीसगाव, फैजपूर आणि यावल पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, तसेच रणजित देवसिंग पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, शरद पाटील, गणेश कुवर, श्रीराम शिंपी, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील आणि भूषण पाटील यांनी केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम