
पाचोऱ्यात गोदाम चोरीचा प्रयत्न
तिघे पोलिसांच्या जाळ्यात
पाचोरा, प्रतिनिधी ;- वरखेडी रोडवरील कालिंका पोल्ट्री फार्मजवळील जयप्रकाश जाधवाणी यांच्या रिकाम्या मद्याच्या बाटल्यांच्या गोदामात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सोयगाव तालुक्यातील मोहन धोंडू पाटील, सोनू प्रकाश पाटील आणि निंभोरा येथील भूषण दिनकर म्हासरे यांनी गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी ७०,००० रुपये किमतीच्या ५ क्विंटल अॅल्युमिनियम बाटल्या आणि ३०,००० रुपये किमतीच्या ४ टन काचेच्या बाटल्या चोरण्याचा प्रयत्न केला. गस्तीवरील पोलीस हवालदार राहुल शिंपी आणि कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली, तर दोघे चोरटे पसार झाले. पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम