पाचोऱ्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात

बातमी शेअर करा...

पाचोऱ्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात 

पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मारक येथे महात्मा फुले यांची १३५ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यतिथीचे औचित्य साधून सावित्री शक्तीपीठ पुणे, शाखा पाचोरा तर्फे महात्मा फुले व सावित्री फुले यांचा जीवनपठ प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी यापूर्वी ज्या मान्यवरांचा सावित्री शक्तिपीठ तर्फे पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आलेला आहे. त्यापैकी समाज भूषण श्रीराम मोतीराम महाले यांना सन्मानपूर्वक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले जीवनपट फोटो फ्रेम प्रदान करण्यात आला तसेच हरिभक्त पारायण सावता महाराज यांनासुद्धा महात्मा फुले सावित्रीबाई फुले जीवनपटाचा एक फोटो प्रदान करण्यात आला. यासोबतच माया रमेश महाजन, सावित्री शक्तीपठाच्या अध्यक्षा अॅड. भाग्यश्री कैलास महाजन यांना सुद्धा हा जीवनपठ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे माळी समाजाचे विश्वस्त चिंधु मोकळ, संतोष महाजन, श्रीराम महाजन यांचेसह भास्कर महाजन, डॉ. अतुल महाजन, डॉ. प्रवीण माळी डॉ. गोरख महाजन, डॉ. संजय जाधव, प्राध्यापक एम.एस. महाज, गोरख महाजन, विजय महाजन, भिला पाटील, प्रा. गोरख ब्राह्मणे (पुणे), शरद गीते, नथू महाजन, शुभम महाजन, मयूर महाजन, प्रमोद महाजन, सुदर्शन महाजन व माळी समाज पंचमंडळ व समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पाचोरा येथील सावित्री शक्तीपीठ समन्वयक व माळी समाज अध्यक्ष के. एस. महाजन यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम