पानिपत येथे होणाऱ्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल धानोरा येथील हर्षवर्धन चौधरी यांचा सत्कार 

बातमी शेअर करा...

पानिपत येथे होणाऱ्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल धानोरा येथील हर्षवर्धन चौधरी यांचा सत्कार 

पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

जळगाव l प्रतिनिधी  येथील धानोरा गावचे हर्षवर्धन चौधरी यांची हरियाणा-पानिपत येथे होणाऱ्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. या यशाबद्दल पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नवलसिंगराजे पाटील यांनी चौधरी यांच्या खेळासाठी स्पॉन्सरशिपही स्वीकारली. या प्रसंगी दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, त्रिमूर्ती कॉलेजचे चेअरमन मनोज पाटील तसेच माही पाटील उपस्थित होते.

हर्षवर्धन चौधरी यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम