
पार उमर्टी घटनेतील दुसऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक
चोपडा पोलीस आणि मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई
पार उमर्टी घटनेतील दुसऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक
चोपडा पोलीस आणि मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई
चोपडा : गुप्त माहितीच्या आधारे १७ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील पार उमर्टी घटनेतील दुसरा आरोपी शेरसिंग लिव्हरसिंग बडोले (वय २३, रा. पार उमर्टी, ता. वरला) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई चोपडा पोलीस व मध्य प्रदेश पोलिसांनी केली. या पूर्वी घटनेच्या दिवशी पप्पूसिंग बर्नाला याला पोलिसांनी अटक केली होती.
या संदर्भात विस्तृत्त वृत्त असे की, १५ रोजी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकावर उमर्टी येथे हल्ला करण्यात आला होता. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील दुसरा आरोपी शेरसिंग लिव्हरसिंग बडोल (वय २३) यास १७ रोजी सायंकाळी ५ वाजता पारउमर्टी (ता. वरला, जि. बडवानी) येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चोपडा उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलिस नाईक रावसाहेब पाटील, चेतन महाजन यांनी केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम