पारगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्यामुळे भीतीचे वातावरण

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी

बातमी शेअर करा...

पारगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्यामुळे भीतीचे वातावरण

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी

चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील धानोरा जवळील पारगाव शिवारात ११ मार्च रोजी रात्री शेतकऱ्यांना पाटचारीजवळ बिबट्या दिसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडेच जिल्ह्यातील काही भागांत बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये ७ वर्षीय मुलावर आणि एका कुत्र्यावर हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

११ मार्च रोजी रात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्यामुळे त्यांनी घरी परत पळ काढला. या घटनेमुळे मजूर देखील दिवसाच्या कामासाठी जाण्यास घाबरत आहेत, ज्यामुळे शेतीकामांवर परिणाम झाला आहे.

गावांमध्ये दंवडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. सध्या गहू, हरभरा आणि मका हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने रात्रीचा विद्युत पुरवठा बंद करून दिवसा विद्युत पुरवठा करावा, जेणेकरून बिबट्याच्या हल्ल्यांपासून जीवित हानी टाळता येईल. तसेच, वनविभागाने तत्काळ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम