
पारोळा बस स्थानकात ५० हजार रुपये चोरी करणारा चोरटा ताब्यात
पारोळा बस स्थानकात ५० हजार रुपये चोरी करणारा चोरटा ताब्यात
गर्दीचा फायदा घेत खिशातून रक्कम लंपास
पारोळा (प्रतिनिधी):
रावेर तालुक्यातील जुनोने येथील अरुण मानसिंग पवार हे पारोळा येथे चुलत सासरे धनराज मकराम चव्हाण यांच्याकडून ऊसतोड कामाचे पैसे घेण्यासाठी आले होते. ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी पैसे घेतल्यानंतर लगेच जळगावला जाण्यासाठी बस स्थानकावर थांबले होते.
बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत लाल-चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेल्या एका तरुणाने अरुण पवार यांना धक्का दिला. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी खिशात पाहिले असता, खिशातील ५० हजार रुपये गायब असल्याचे लक्षात आले.
याबाबत त्यांनी तातडीने पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित तरुणाचा शोध घेण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या चोरट्याकडून काही रक्कम हस्तगत करण्यात आली असून उर्वरित रक्कमेचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम