पारोळा येथील युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

बातमी शेअर करा...

पारोळा येथील युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

पारोळा : शहरातील धरणगाव रस्त्यावर २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडके ने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

येथील मोरफळ गल्लीत राहणार चेतन सुरेश भावसार (वय ३०) हा तरुण २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील दुचाकी

(एमएच- १९, डीएफ-५०३०) ने येत असताना पारोळा शहराजवळील धरणगाव रस्त्यालगत अज्ञात वाहनाने धडक त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुर्दैवाने चेतन भावसार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भावेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम