पारोळ्यातील सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवनदान

बातमी शेअर करा...

पारोळ्यातील सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवनदान

पारोळा —प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील वाघरे येथे चंदू रामू हटकर यांना त्यांच्या म्हशींच्या गोठ्यात ४.५ ते ५ फूट लांबीचा साप दिसला. साप पाहून त्यांनी सापाला न मारता सापाला पकडण्यासाठी पारोळा येथील सर्पमित्र रवी कंडारे यांच्याशी संपर्क करून सापाबद्दल सांगितले. सर्पमित्र रवी कंडारे, राहुल भोई व सुमित पाटील विलंब न करता सापाला सुरक्षित पकडण्यासाठी त्वरित वाघरे येथे गेले. तेथे जाऊन सापाची पाहणी केल्यास तेथे भारतीय अजगर बिनविषारी जातीचा साप असल्याचे आढळून आले. त्यांनी सापाला सुरक्षित पकडून सापाची व्यवस्थित पाहणी केली. सापला पाहण्यासाठी तेथील स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी सर्पमित्र यांनी समस्त उपस्थित गावकऱ्यांना सापबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मनातील सपाबद्दलची भीती दूर केली नागरिकांना जागृत केले. व सापाला न मारल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले. नंतर वनपाल नंदू पाटील, वनरक्षक रोहिणी सूर्यवंशी मॅडम, ईश्वर चौधरी यांच्या मार्गदर्शनात सर्पमित्र भूषण पाटील, रवी कंडारे, प्रविण जगताप, मयूर पाठक, निंबा मराठे, संदीप पाटील, ओम शिंपी, सुमित पाटील, राहुल भोई यांनी अजगराला जंगलात सुरक्षित सोडून जीवनदान दिले. सापाला सोडण्यावेळी महेंद्र पाटील, स्वामी बाविस्कर, व गौरव पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम