
पारोळ्यात धर्म ध्वाजा स्थापन निमित्त आनंदोत्सव
पारोळ्यात धर्म ध्वाजा स्थापन निमित्त आनंदोत्सव
पारोळा –प्रतिनिधी पारोळा शहरातील पुरातन अश्या
श्रीमोठे राम मंदिर संस्थानच्या वतीने
अयोध्या येथील श्रीराम मंदिर शिखर धर्म ध्वाजा स्थापन निमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच
मार्गशिर्ष शुद्ध पंचमी
विवाह पंचमी म्हणून साजरी करण्यात आली याप्रसंगी
विवाह पंचमी
निमित्त प्रभू श्रीराम व सीता माता यांचा सजीव भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तसेच अयोध्या येथील श्री राम मंदिर शिखर वर धर्म ध्वज स्थापन निमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी देवगिरी कल्याणश्रम महिला मंडळ यांनी भजन, नृत्य सादर केले तसेच सजीव विवाह सोहळ्यानंतर महाआरती करून श्रीरामांवर वर पुष्प वृष्टी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच यावेळी आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचा यशस्विते साठी श्रीमोठे राम मंदिर संस्थान ट्रस्टी,देवगिरी कल्याण आश्रम चे सदस्य तसेच श्री राम भक्तानी सहकार्य केले.या कार्यक्रमांचे अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम