पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा बस स्टँडवर पाणपोईचे उद्घाटन

बातमी शेअर करा...

पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा बस स्टँडवर पाणपोईचे उद्घाटन

चोपडा प्रतिनिधी

सध्या उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे सर्वत्र त्रास सहन करावा लागत आहे. चोपडा बस स्टँडवर दररोज शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. याच पार्श्वभूमीवर, पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वलय सुनील पाटील (सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष) आणि माजी जिल्हाध्यक्ष तसेच माजी झेडपी सदस्य सुनील पाटील यांच्या संकल्पनेतून बस स्टँडवर मोफत पाणपोई सुरू करण्यात आली.या पाणपोईचे उद्घाटन माजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते आणि आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी परेश देशमुख (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), गिरीश देशमुख (शहर अध्यक्ष), रमाकांत बोरसे (चेअरमन, मराठा पतपेढी), ॲड. दिनेश वाघ, नरेंद्र आबा पाटील, धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सुनील पाटील यांनी सांगितले की, संपूर्ण उन्हाळ्यात प्रवाशांना थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचे हे कार्य अविरत सुरू राहील.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम