पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वणी गडावर सप्तशृंगी मातेच्या चरणी शेतकऱ्यांसाठी प्रार्थना

बातमी शेअर करा...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वणी गडावर सप्तशृंगी मातेच्या चरणी शेतकऱ्यांसाठी प्रार्थना

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी वणी गडावर जाऊन सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. सकाळी त्यांनी कुटुंबीय व कार्यकर्त्यांसह गडावर जाऊन दर्शन घेतले. मंदिर परिसरात गड समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या आलेल्या पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे घामाने पिकवलेले पीक पाण्याखाली गेले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी सप्तशृंगी मातेकडे शेतकऱ्यांसाठी विशेष प्रार्थना केली. त्यांनी मातेच्या चरणी नम्रतेने विनंती करताना शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्याचे सामर्थ्य मिळावे, त्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा आणि राज्यात सर्वत्र समाधानकारक परिस्थिती निर्माण व्हावी, अशी प्रार्थना केली.

दर्शनानंतर पालकमंत्री पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “शेतकऱ्यांवर आलेले संकट हे राज्याचेही संकट आहे. सरकार त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आणि शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.”

या वेळी वणी गड समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही पालकमंत्र्यांचे स्वागत केले. सप्तशृंगी देवीच्या दर्शनानंतर त्यांनी गडावर काही वेळ भक्तांशी संवाद साधला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम