पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांची बीडमध्ये उपस्थिती

बातमी शेअर करा...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांची बीडमध्ये उपस्थिती

शुभविवाह प्रसंगी वधू-वरांना शुभेच्छा

प्रतिनिधी | बीड महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात डोंगर पाटील यांच्या परिवारातील शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.

बीड जिल्ह्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला स्थानिक मान्यवर, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवलसिंगराजे पाटील यांनी गुलाबराव पाटील साहेबांच्या वतीने वधू-वरांना सौभाग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा देत विवाह भेट अर्पण केली. त्यांनी डोंगर पाटील परिवारातील ज्येष्ठ सदस्यांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या कार्याची दखल घेत परिवारातील ऐक्य व सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

यावेळी बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी नवलसिंगराजे पाटील यांचे स्वागत करत त्यांना पालकमंत्र्यांचा विश्वासू सहकारी म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. पाटील यांनीही आपुलकीने सर्व पाहुण्यांचे आभार मानले आणि सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले.

या विवाह सोहळ्यात आनंद, उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले. नवलसिंगराजे पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. उपस्थित मान्यवरांनी गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले आणि जळगावप्रमाणेच बीड जिल्ह्यातही विकासाची गती वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी बीड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम