
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग पाटील यांची म्हैसवाडी येथे सदिच्छा भेट
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग पाटील यांची म्हैसवाडी येथे सदिच्छा भेट
यावल (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांनी यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या लग्न समारंभास उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
सामाजिक व वैयक्तिक नातेसंबंध जपण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यशैली त्यांच्या टीममधील सदस्यांमधूनही सातत्याने दिसून येते. त्याच परंपरेत स्वीय सहाय्यक नवलसिंग पाटील यांनी आपल्या सौजन्यपूर्ण उपस्थितीने समारंभाला विशेष ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली.
समारंभस्थळी गावकरी, मान्यवर आणि युवा मंडळी यांनी त्यांचे स्वागत करत जिल्हा प्रशासनाशी असलेल्या त्यांच्या सक्रिय संवादाचे कौतुक केले. त्यांनी गावकरी आणि उपस्थितांशी हितगुज करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आवश्यक मदतीसाठी आपली सदैव साथ राहील, असे आश्वस्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम