
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वह्या वाटप
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वह्या वाटप
शिवसेना (शिंदे गट) सदस्य नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव | प्रतिनिधी
श्री गणेश क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच श्री गुरूदत्त युवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना (शिंदे गट) ची सदस्य नोंदणी मोहीम, गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ आणि शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम रविवार, १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा गौरव समारंभ मा. नवनाथ दारकुंडे (नगरसेवक प्रभाग क्र. २ तथा स्थायी समिती सदस्य, मनपा) यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमास माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण, विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय मुलांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार असून, स्थानिक पातळीवर सामाजिक भान जोपासणाऱ्या संस्था आणि मंडळांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असल्याचे मानले जात आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम