पाळधीत गोडावून फोडून चोरी; तिघांना अटक

धरणगाव पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा...

पाळधीत गोडावून फोडून चोरी; तिघांना अटक

धरणगाव पोलिसांची कारवाई

पाळधी (ता. धरणगाव) वार्ताहर येथील महामार्गालगत झुलेलाल कॉम्प्लेक्समधील गोडावूनचे शटर उचकावून झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एक संशयित अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. चोरट्यांनी गोडावूनचे शटर उचकावून आत प्रवेश केला आणि जुन्या रॅकवर ठेवलेल्या ३३० किलो वजनाच्या लोखंडी प्लेट्स, अंदाजे २० हजार रुपये किमतीच्या, लंपास केल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांना पाळधी गावातील स्टेशन रोड परिसरात संशयास्पद हालचाली करणारे दोन युवक आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

अटक केलेल्या आरोपींमध्ये सुनिल वशवंत नन्नवरे (रा. पाळधी), कपिल चैत्राम धनगर (रा. सावखेडा), आणि सुनिल सुपडू सोनवणे (रा. पाळधी) यांचा समावेश आहे. चौघा आरोपींपैकी पंकज उर्फ मुकेश शालिक नन्नवरे (रा. बांभोरी) हा अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई चोपडा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पवन देसले, सपोनि निलेश वाघ, प्रशांत कंडारे, संतोष पवार यांच्यासह सुनिल लोहार, प्रविण तांदळे, प्रविण सुरवाडे, ज्ञानेश्वर बाविस्कर, महेश देवरे, रमेश सूर्यवंशी आणि रवींद्र इंगळे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम