पाळधीत संत तुकाराम बीज निमित्त पालखी परिक्रमा उत्साहात

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन

बातमी शेअर करा...

पाळधीत संत तुकाराम बीज निमित्त पालखी परिक्रमा उत्साहात
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन

पाळधी, ता. धरणगाव: प्रतिनिधी

पंचक्रोशीतील श्री संत तुकाराम मराठा समाज मंडळातर्फे संत तुकाराम बीज निमित्त पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. यानंतर काही अंतर पालकमंत्र्यांनी स्वतः पालखी खांद्यावर घेत मिरवणुकीत सहभाग घेतला. वारकरी मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभंगगायन आणि वादन करत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले.

शिवकालीन वेशभूषेतील चिमुकल्यांनी वेधले लक्ष
मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेतील वंशिका विशाल महाजन आणि दक्ष संदीप पाटील या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पालखी परिक्रमेची सांगता आणि महाप्रसाद वितरण
पालखी परिक्रमेची सांगता श्री गायत्री शक्तीपीठ येथे संत तुकाराम आरतीने झाली. या वेळी दोनगाव सरपंच भागवत पाटील, डेप्युटी सुरेश पाटील, संजय महाजन, भगवान मराठे, गोपाल सोनवणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील सर यांनी केले. भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

भाविक भक्त कीर्तनात तल्लीन
रात्री ह. भ. प. विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये उपस्थित भाविक भक्त तल्लीन झाले.

मिरवणुकीत मान्यवर आणि ग्रामस्थांचा सहभाग
या पालखी मिरवणुकीत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अनिल माळी, सरपंच शरद कोळी, उपसरपंच दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल कासट, धनराज कासट, सुनील झंवर, कैलास पाटील, एन. एस. पाटील, संदीप पाटील, रमेश पाटील, किरण पाटील, श्रीराम पाटील, रतिलाल पाटील, राकेश पाटील, भूषण शिंदे, आबा लंके, हेमंत पाटील, शरद पाटील यांच्यासह समाज बांधव आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संपूर्ण पालखी परिक्रमेवेळी भक्तिरसाने भारावलेले वातावरण आणि भाविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भव्य आणि भक्तिमय झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम