पाळधी पोलीस चौकीत पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ

बातमी शेअर करा...

पाळधी पोलीस चौकीत पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ
पाळधी, ता. धरणगाव : येथील काही संशयिताना पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलाविले असता त्यांनी तेथेच हाणामारी केली. तर ही हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच त्यांनी धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

पाळधी बस स्थानक परिसरात दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. या बाबत पाळधी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी काही संशयितांना बोलावले होते. मात्र, त्यांनी तेथेच हाणामारी सुरू केली. पोलीस चौकी आवारात हाणामारी सुरू असताना त्यांनी त्यांच्याजवळ असलेले भ्रमणध्वनी जमिनीवर आदळून फोडले.

या वेळी पाळधी पोलीस चौकीचे कर्मचारी भांडणसोडवण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांनाच शिवीगाळ, धक्काबुक्की करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी प्रवीण तांदळे यांच्या शर्टाची कॉलर पकडून शर्ट फाडला, तर मुस्तकिम पटेल याने काठी सुनील पाटील यांच्या हातावर मारली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुस्तकीम अजीज पटेल, नीलेश सुरेश वानखेडे, अनिकेत धनराज महाजन यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या वेळी तेथे हजर असलेली एक महिला व एक अल्पवयीन मुलगा फरार झाला आहे. तपास स.पो.नि. प्रशांत कंडारे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम