
पाळधी येथे संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
पाळधी येथे संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी भाऊसाहेब गुलाबराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यात “आपले संविधान, आपला अभिमान” या विषयावर व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले होते. ज्यात प्रमुख व्याख्याता म्हणून प्रा. शुभांगी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटने विषयी सखोल व तथ्यात्मक असे मार्गदर्शन केले. यावेळेस प्रा. जयश्री चौधरी यांच्याकडून संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उर्मिला कंखरे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व अतिथी म्हणून संस्था अध्यक्ष मा. श्री. विक्रमराव पाटील, मा. प्राचार्य प्रा. अजिंक्य जोशी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय बाविस्कर सर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी श्रावणे व महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम