पाळधी येथे ३१ मे रोजी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर

बातमी शेअर करा...

पाळधी येथे ३१ मे रोजी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने ३१ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता, शासकीय विश्रामगृह, पाळधी खु. येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा पुढाकार प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत अडथळा निर्माण होऊ न देता गरजू रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देणे, हा आहे. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी जे ऑपरेशनसाठी पात्र ठरतील, त्यांच्यावर पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उपचार, जेवण, निवास व प्रवासाचा सर्व खर्च जीपीएस मित्र परिवार स्वतः उचलणार आहे.

या शिबिरासाठी पुणे, मुंबई आणि पनवेल येथील नेत्रतज्ज्ञांची विशेष टीम पाळधी येथे येणार असून प्रगत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अचूक तपासणी केली जाईल.

संपर्कासाठी:
7517509090 / 8999349004

प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शिबिराच्या यशासाठी ग्रामस्थ, स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी व विविध संघटनांचे सहकार्य लाभत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम